शहरी राहणी, उच्च शिक्षण, बैठं काम, भरपूर पैसा, बाहेरचं खाणं, अपुरी झोप, व्यायाम नाही, तंबाखू-दारूचं बरेचदा सेवन, वाढणारं वजन.. घरोघरच्या तरुण मंडळींचं सध्या असंच राहणीमान आहे. त्यातच भर म्हणजे उशिरा लग्न, तुरळक कामजीवन, उशिरा मुलाचा विचार, पाळीच्या तक्रारी, गर्भ कसा राहतो याविषयी (अविश्वसनीय, पण खरं) अज्ञान.
परिणामी पस्तिशी जवळ आली तरी ‘पाळणा’ हलत नाही. एक वेळ अशी येते की आता बाळ पाहिजे, आत्ताच पाहिजे, असं वाटायला लागतं. मग वाट कसली बघताय... एकवेळ जोडीने अवश्य भेट द्या..