PCOD (Polycystic ovarian disease )
PCOD आजकाल 50 % मुलीच्यात आढळतो . हा एक हॉर्मोन्स च्या imbalance मुले उद्धभवतो. Actually आजकाल जी जीवनशैली आहे ( sedmentry life style ) म्हणजे कष्ट कमी बैठे काम , फास्ट फूड , जंक फूड stress ताण तणाव यामुळे वाढणारे वजन व वजनामुळे होणारा हार्मोन्समधील imbalance .
पाळी अनियमित येणे, २-३ महिने पाळी न येणे, पाळीच्या वेळेस रक्तरस्त्राव कमी होणे, वजन वाढणे, पिंपल्स आणि गळयाभोवती ची त्वचा काळसर होणे, रक्तातील इन्सुलिन चे प्रमाण वाढणे व चरबीचे प्रमाण वाढणे.
आणि याचा सर्व परिणाम म्हणून स्त्रीबीज दर महिन्याला जे तयार व्हायला पाहिजे ते न होता, न फुटता त्याची पाण्याने भरलेली गाठ तयार होते. अशा असंख्य गाठी ज्यावेळी स्त्रीबीजांडाला होतात यालाच Polycystic ovary असे म्हणतात.
स्त्रीबीज न फुटल्याने, विवाहित स्त्रीला गर्भधारणा होणे, गर्भ राहिला तरी त्याची पूर्णपणे वाढ होणे यावर परिणाम होतो
म्हणजेच मुलींनो जागे व्हा , आणि वेळीच स्वतःच्या वजनाकडे ,पाळी कडे लक्ष द्या . बाहेरचे फास्ट फूड पेक्षा घरचे पालेभाजी ,मोड आलेल्या उसळी ,कच्या कोशिंबरी , ताजी फळे यावर भर दया .नियमित exercise तो कुठल्याही प्रकारचा असो, walking,cycling,Arobics, gym, dance करत रहा व आपले व्यक्तिमत्व आत्मविश्वासाने फुलू दया.