खुब्याच्या प्रत्यारोपणाविषयी नवीन दृष्टिकोन

Dr. Rohit Luthra

खुब्याच्या प्रत्यारोपणाविषयी नवीन दृष्टिकोन

खुबा हा शरीरातील वजन पेलणाऱ्या काही महत्वाच्या सांध्यापैकी एक सांधा आहे. खुब्यातील संधिवात हा सांध्यांनमधील वंगण कमी झाल्या मुळे सांध्यांची झीज होण्यास कारणीभूत ठरतो. सर्व वयोगटातील किमान 3,4 टक्के लोकांना ही समस्या असते. हाडाच्या पृष्ठभागी होणारे थेट घर्षण यामुळे सांध्यातील वेदना, सांधे आखडणे तसेच सूज येणे यासारखे त्रास संभवतात . Hip arhrahitis अर्थात खुब्यातील संधिवात याचे कोणतेही विशिष्ट कारण नसते. तरीही मांडीच्या हाडाला झालेली दुखापत किंवा त्याच्या अग्रभागी होत असलेला अपुरा रक्त   पुरवठा हेच प्रामुख्याने यासाठी कारणीभूत ठरते. यालाच Avascular necrosis म्हणतात. ज्याचे वर्गीकरण चार स्तरावर केले जाते. पहिल्या आणि दुसऱ्या स्तरावरील  संधिवात मध्ये चालण्यात अडचण येणे, वेदना होणे याचा समावेश होतो. सामान्यतः या स्तरावरील आजार औषधोपचारांनी बारा होतो.  तिसऱ्या स्तरावर वेदना वाढीसह, खुब्याची क्षमता कमी होऊन अपंगत्व वाढते. चौथ्या स्तरावर खुब्याच्या सांध्यातील खळग्याचे आणखी नुकसान होते. म्हणून तिसऱ्या आणि चौथ्या स्तरावर मात्र शस्रक्रिया आवश्यक असते.  ज्यात हाड कलम करणे तसेच संपूर्ण सांध्यांच्या प्रत्यारोपणाचा देखील समावेश होतो. यालाच Total  Hip Replacement म्हणतात. 

सदर लेख वरील कोणताही प्रश्न किंवा शंका बाबत तुम्ही डॉ रोहित लुथ्रा यांच्याशी https://www.arcushospital.com या वेब साईट वर किंवा dr.rohitluthra@gmail.com या ई-मेल द्वारे संपर्क साधू शकता.
?
Ask Question
AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com
Disclaimer: The information provided here should not be used during any medical emergency or for the diagnosis or treatment of any medical condition. The information is provided solely for educational purpose and should not be considered a substitute for medical advice.